दिल्ली :

भारतीय वायुसेनेत  अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरची नवीन भरती  जाहीर करण्यात आली आहे. वायुसेनेने एक अधिसूचना जारी केली आहे आणि घोषणा केली आहे की अग्निवीरवायूच्या जानेवारी 2023 मधील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज  नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतील. यासाठी महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार नोंदणी करू शकतात. या भरतीसाठी ऑनलाईन लेखी परीक्षा जानेवारी 2023 मध्ये घेतली जाईल. अर्ज प्रक्रिया 07 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होणार आहे. तर ऑनलाइन अर्ज करण्याची अखेरची तारीख 23 नोव्हेंबर ही असणार आहे. अग्निवीर भरतीची ऑनलाइन परीक्षा 18 ते 24 जानेवारी 2023 या काळात घेतली जाणार आहे.

काय आहे अग्निपथ योजना ?

अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात 4 वर्षांसाठी सैनिकांची भरती केली जात आहे. वायुसेनेच्या अग्निवीरांना अग्निवीरवायू असे नाव देण्यात आले आहे. 4 वर्षांनंतर 75 टक्के सैनिकांना घरी पाठवले जाईल. उर्वरित 25 टक्के अग्निवीरांना कायमस्वरूपी जवान म्हणून नियुक्त केले जाईल. 2022 सालासाठी हवाई दलात अग्निवीरवायूची भरती प्रक्रिया पार पडली आहे. आता ही भरती 2023 साठी सुरू होणार आहे. चार वर्षे सेवा दिल्यानंतर मोठी रक्कम देण्यात येणार आहे. यासोबतच त्यांना अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्रही देखील दिले जाईल. अग्निवीरांना दरवर्षी सेवेदरम्यान 30 दिवसांची रजा देण्यात येईल. आजारी असल्यास त्यांना विशेष रजा देखील घेता येऊ शकतात.

कसा भरावा अर्ज ?

रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यासंदर्भातील आवश्यक माहिती वायुसेनेच्या वेबसाइटवर पाहिली जाऊ शकते. उमेदवारांना रजिस्ट्रेशनसाठी https://agnipathvayu.cdac.in या वेबसाइटवर लॉगिन करावे लागते. येथे गेल्यावर होमपेजवर तुम्हाला अप्लाय ऑनलाइन यावर क्लिक करायचे आहे. यानंतर पहिले साइन इन करावे लागेल. यानंतर तुम्हाला लॉगिन आणि पासवर्ड मिळेल. या नंतरच तुम्हाला अर्ज भरता येणार आहे. हा अर्ज भरण्याची फीस 250 रुपये आहे. तुम्हाला अर्जाच्या सर्वात शेवटीला ही फीस भरावी लागणार आहे.

पात्रता काय ?

  • गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयात 12 वीत किमान 50% गुण असावेत. इंग्रजीमध्ये किमान 50% गुण असणे आवश्यक आहे.
  • 50% गुणांसह तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा धारक देखील अर्ज करु शकतात.
  • फिजिक्स आणि मॅथ्ससह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम केलेले उमेदवार देखील अर्ज करु शकतात. त्यांनादेखील किमान 50% गुण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचे वय 17.5 वर्षांपेक्षा जास्त आणि 21 वर्षांपेक्षा कमी असावे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराची उंची किमान 152.5 सेमी असावी. त्याला त्याची छाती 5 सेमीने फुगवता यायला हवी.
Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!