दिल्ली :

सेंट्रल बँक डिजिटल करेंसी  चा पहिला पायलट प्रोजेक्ट मंगळवारी डिजिटल रुपया लाँच करणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. सरकारी सुरक्षा व्यवहारात त्याचा वापर केला जाईल. हे फक्त घाऊक व्यवसायासाठी असेल. RBI ने सांगितले की, 1 महिन्याच्या आत रिटेल सेगमेंटसाठी देखील डिजिटल रुपी  लॉन्च करण्याची योजना आहे. निवडक ठिकाणी काही निवडक यूझर्ससाठी ते प्रथम लॉन्च केले जाईल. या यूझर्समध्ये ग्राहक आणि व्यापारी यांचा समावेश असेल.डिजिटल करेंसी आणण्याची चर्चा अर्थसंकल्पाच्या घोषणेच्या वेळीच झाली होती. तेव्हापासून डिजिटल चलन कधी येणार याची प्रतीक्षा होती.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, यामुळे भारताची डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल, पेमेंट सिस्टम अधिक कार्यक्षम होईल आणि मनी लाँडरिंगला प्रतिबंध घालण्यास मदत मिळेल. सरकारी रोख्यांच्या सेटलमेंटसाठी डिजिटल चलनाचा वापर केला जाईल. या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्यासाठी 9 बँकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया , बँक ऑफ बडोदा , युनियन बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, IDFC फर्स्ट बँक आणि HSBC बँक यांचा समावेश असेल.

डिजिटल करेंसीचे फायदे काय ?

देशात आरबीआयचे डिजिटल चलन (E-Rupee)सुरू झाल्यानंतर, कॅश ठेवण्याची गरज पडणार नाही. तुम्ही ते तुमच्या मोबाईल वॉलेटमध्ये ठेवता येईल. या डिजिटल करेंसीच्या चलनावर रिझर्व्ह बँकेचे पूर्ण नियंत्रण असेल. डिजिटल चलन सुरू झाल्यामुळे सरकारसोबत सामान्य लोक आणइ बिझनेससाठीच्या व्यवहारांची किंमत कमी होईल.

डिजिटल RUPEE चे वैशिष्ट्ये काय?

  • CBDC हे देशाचे डिजिटल टोकन असेल.
  • बिझनेसमध्ये पैशाच्या व्यवहाराचे काम सोपे होईल.
  • चेक, बँक खात्यातून ट्रांझेक्शनचा त्रास होणार नाही.
  • काही सेकंदात मोबाईलवरून पैसे ट्रान्सफर होतील.
  • बनावट नोटांच्या समस्येपासून सुटका होईल.
  • कागदी नोटा छापण्याचा खर्च वाचेल.
  • सीबीडीसी डॅमेज केले जाऊ शकणार नाही.

CBDC हे मध्यवर्ती बँकेने जारी केलेल्या चलनी नोटांचे डिजिटल रुप आहे. जगभरातील बहुतांश केंद्रीय बँका सध्या CBDC जारी करण्याच्या पद्धतींवर विचार करत आहेत. हे जारी करण्याच्या पद्धती प्रत्येक देशाच्या विशिष्ट गरजांनुसार बदलतात.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!