गुजरात
गुजरातमधील मोरबी भागात रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे मच्छू नदीत एक केबल पूल कोसळला , ज्यामध्ये 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. केबल ब्रिजला पालिकेकडून प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताच्या वेळी पुलावर सुमारे 400 लोक उपस्थित होते. यापैकी 400 हून अधिक लोक नदीत पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. दुरूस्तीनंतर हा पूल नुकताच पाच दिवसांपूर्वी पुन्हा लोकांसाठी खुला करण्यात होता. पूल रविवारच्या सुट्टीमुळे गजबजलेला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास पूल तुटला
पंतप्रधान मोदी या घटनेची क्षणोक्षणी माहिती घेत आहेत
पंतप्रधान कार्यालयाने (PMO) एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबाबत मुख्यमंत्री पटेल आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मोदी सध्या गुजरातमध्ये आहेत. पीएमओने म्हटले आहे की, ‘त्यांनी (पंतप्रधान मोदी) बचाव कार्यासाठी तातडीने पथके तैनात करण्यास सांगितले आहे. त्यांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास आणि बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत करण्यास सांगितले आहे
मृत आणि जखमींना मदत जाहीर
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. त्याचबरोबर जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. गुजरात सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
अमित शाहांनीही व्यक्त केला शोक
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही या अपघातावर वक्तव्य आले आहे. ते म्हणाले. ‘मोरबी येथे झालेल्या दुर्घटनेने अत्यंत दु:ख झालो आहे. या संदर्भात मी गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी आणि इतर अधिकाऱ्यांशी बोललो. स्थानिक प्रशासन पूर्ण तयारीनिशी मदतकार्यात गुंतले आहे, एनडीआरएफही लवकरच घटनास्थळी पोहोचणार आहे. प्रशासनाला जखमींना तातडीने उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत.’
