बोरी,ता.जुन्नर
बोरी बुद्रुक येथील कुकडी कालव्यात सापडले अनोळखी महिलेचे प्रेत.कुकडी डाव्या कालव्याच्या बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत आज एक स्त्री जातीचे अनोळखी प्रेत वाहत्या पाण्यात मिळून आलेले असून तिचे वय अंदाजे ६० ते ६५ वर्षे असुन या महिलेच्या दोन्ही हातात हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या,अंगात विटकरी ब्लाऊज रंगाचा असून गुलाबी रंगाचा परकर घातलेला दिसत आहे. सदर कालव्यातून प्रेत काढण्यासाठी जुन्नर रेस्कू टिम आली होती.
सदरची मयत महिला जर कोणाच्या ओळखीची किंवा परिचयाची असेल तर आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या ९०७७१००१०० या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिनिधी:-राजू भोर,साळवाडी
