रेणापूर,लातूर

दिनांक १०/०९/२०२२ रोजी लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील मौजे शेरा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांनी कादोपत्री पालक मेळाव्याची नोटीस दिनांक ०२/०९/२०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली व पालक मेळाव्याची तारीख ०६/०९/२०२२ रोजी ठेवण्यात आली व गावातील राजकीय लोकांनी व मुख्याध्यापक यांनी मिळून तारिकेत बदल करून ती

ती तारीख १०/०९/२०२२ केली व दिनांक ०९/०९/२०२२ रोजी गणेश विसर्जन असतात सर्व विद्यार्थी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी असतांनाच यांनी जे पालक अज्ञान आहेत अशा पालकांच्या नोटीसवर स्वाक्षरी घेवून पालक मेळावा घेण्यात आला या पालक मेळाव्यात श्री शिक्षण विस्तार अधिकारी भिकाने सर आले होते त्यांना वेळोवेळी पालक सांगत होते की, आपण चुकीच्या पद्धतीने आरक्षण पाडून सुशिक्षीत पालकांना प्राधान्य देण्यात यावे असे सांगत होते परंतु त्या पालकांच्या विचाराला केराची टोपली दाखवून व नियमांचे उल्लंघन करून समिती गठीत करण्यासाठी सर्व तो परीने प्रयत्न केला

एका विशिष्ट जातीच्या लोकांना प्राधान्य देवून समिती गठीत करण्यात आली. या समितीवर आक्षेप नोंदविण्यासाठी मा गटशिक्षणाधिकारी साहेब यांच्या कार्यालयात तक्रार अर्ज देण्यात आला व मा मुख्याध्यापक यांना तक्रार अर्ज देण्यात आला यावे ग्रामपंचायत सदस्य श्री प्रताप भुरे,तंडामुक्त समितीचे अध्यक्ष श्री कल्याण दादा भुरे,मा पोलिस पाटील श्री मधुकर भुरे,श्री रामकिशन आकनगिरे श्री नंदकुमार भुरे,श्री शरद भुतके श्री भागवत बंडू भुरे,श्री अजय भुतके,पप्पु भुरे,हि मंडळी उपस्थितीत होती.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!