मुंबई:-

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द आहे.दरम्यान यावरून भगतसिंग कोश्यारी हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे सरकारची वैधता सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना 12 आमदारांची यादी रद्द करण्याची मागणी राज्यपालांनी मंजुर करण्याची घाई केली आहे ,असा आक्षेप या याचिकेतन करण्यात आला.ही याचिका दिपक जगदेव यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाखल केली आहे.या याचिकेवर उद्या सोमवारी प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे.विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांची 12 जणांची यादी ठाकरे सरकारने 2020 मध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवली होती मात्र त्यानंतर 2 वर्ष या यादीबाबत काहीच निर्णय घेण्यात आला नाही यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड करून सत्तांतर घडून आणले.

 

त्यामुळे ठाकरेंनी त्यांच्या कार्यकाळात पाठवलेली यादी रद्द करावी,अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात केली त्यानंतर,लागलीच दुसऱ्याच दिवशी राज्यपालांनी ही मागणी मंजूर केली तसेच एकनाथ शिंदे नव्याने 12 जणांची यादी पाठवणार असल्याचे समोर आले आहे,परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ही कृती त्यांना अडचणीत आणण्याची आहे. दरम्यान यापूर्वी 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत नाशिकमधील रतन सोली यांनीही राज्यपाल विरोधात जनहित याचिका दाखल केली होती.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!