अकोले :
शिर्डी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर 16 मार्च रोजी शिर्डी येथे होणाऱ्या युवक पदाधिकारी मेळाव्यासाठी अकोले येथे शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी महाविकास आघाडी युवक पदाधिकारी बैठकीचे आयोजन केले गेले होते.
या बैठकीसाठी युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा शिवसेना उपनेत्या शीतलताई देवरुखकर, युवासेना विभागीय विस्तारक विराजजी कवाडिया,शिर्डी लोकसभेचे विस्तारक मितेशजी साटम, नगर लोकसभेचे विस्तारक अजयजी व्हनोळे, युवासेना जिल्हाप्रमुख अमितजी चव्हाण, युवासेना विस्तारक सुनिलभैय्या तिवारी,युवासेना विस्तारक श्रुतीताई मोरे, जळगाव संपर्क प्रमुख चौधरी साहेब,अकोले विधानसभा संपर्कप्रमुख मिलिंदजी मांदळकर,अकोले विधानसभा संघटक मधुकरराव तळपाडे,युवासेना जिल्हा चिटणीस संदेशजी एखंडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख सुनिलजी गिते,युवासेना जिल्हा समन्वयक पप्पूशेठ कानकाटे,अकोले विधानसभा समन्वयक अमोलजी शेळके, युवासेना अकोले तालुका प्रमुख शहर गणेशजी अस्वले, युवासेना ग्रामीण तालुका प्रमुख राहुलभाऊ लांडे, किरण जपे तालुका प्रमुख राहता ,युवासेना अकोले शहर प्रमुख महेश हासे, युवासेना कार्याध्यक्ष अमोलजी पवार, शहर चिटणीस अरुण गोंदके,उपतालुका प्रमुख स्वप्नील एखंडे,ब्राम्हणवाडा गणप्रमुख स्वप्नील आरोटे, आढळा विभाग प्रमुख राहुल गोर्डे, संगमनेर युवासेनेचे शहर प्रमुख गोविंदजी नागरे,संगमनेर शिवसेनेचे मा. शहरप्रमुख अमर कतारी, अकोले राष्ट्रवादी युवक चे तालुका अध्यक्ष परीक्षित भोर,काँग्रेस चे तालुका अध्यक्ष अमोलजी नाईकवाडी, युवक काँग्रेस चे शहर अध्यक्ष तन्मय गाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहर अध्यक्ष ओम कुऱ्हाडे, विकासजी बंगाळ बिरसा ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष पंढरीनाथ खाडे, रमेश खाडे, नवनाथ लहाने, कैलास कोरडे,युवासेनेचे शाखाप्रमुख सूर्यभान गोर्डे,गणेश शेळके, रामभाऊ एखंडे,संतोष अस्वले, शुभम आंबरे,अनिल आहेर संतोषजी सहाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत शीतलताई देवरुखकर, मितेशजी साटम, मधुकरराव तळपाडे, रोहितदादा वाकचौरे यांनी मार्गदर्शन केले. प्रस्तावना युवासेनेचे ग्रामीण तालुका प्रमुख राहुल लांडे यांनी तर स्वागत युवक काँग्रेस चे तालुका अध्यक्ष अमोलजी नाईकवाडी व आभार युवासेना तालुका प्रमुख शहर गणेश अस्वले यांनी मानले. अकोले युवासेनेच्या वतीने बैठक चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी युवासेनेचे अकोले तालुका प्रमुख शहर गणेशजी अस्वले तसेच ग्रामीण तालुका प्रमुख राहुलभाऊ लांडे, महेश हासे,जिल्हा चिटणीस संदेश एखंडे,उपजिल्हा प्रमुख सुनील गिते, विधानसभा समन्वयक अमोलजी शेळके, शहर चिटणीस अरुण गोंदके, कार्याध्यक्ष अमोलजी पवार यांनी नियोजन केले.