सातारारोड ,ता.कोरेगाव येथील श्री.क्षेत्र जरंडेश्वर डोंगरावर जरंडेश्वर देवस्थान जिर्णोद्धार समिती ,माहेश्वरी समाज सातारा ,डॉ.गदगकर हायस्कूल ,जरंडेश्वर कनिष्ठ महाविद्यालय – सातारारोड व भाविक – भक्त यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी जरंडेश्वर डोंगरावर असणारा सर्व प्रकारचा कचरा गोळा करण्यात आला.सर्वांनी मिळून अंदाजे वीस पोती कचरा गोळा केला .

यावेळी उपस्थित सर्व मंडळींना उद्योजक मनोज पानसकर ,हिम्मत पाटील यांनी नाष्टा व फराळाची सोय उपलब्ध करून दिली होती.
याबद्दल या मोहिमेत सहभागी सर्व मान्यवरांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिनिधी,

संदीप पवार

सातारारोड .

 

 

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!