जुन्नर तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील दुर्गम भागात जाऊन ज्या मुलांचे आई वडील मोल मजुरी करून उदरनिर्वाह करतात त्यांच्या पाल्यांना शिक्षणाची रुची वाढावी आवड निर्माण व्हावी या हेतूने शालेय उपयोगी दफ्तरांचे वाटप बजरंग दला मार्फत करण्यात आले. यापुढे ही शालेय शिक्षणासाठी ज्या ज्या उपयोगी वस्तुंची गरज भासेल अश्या गोष्टींची पूर्तता करण्याचे वचन देखील या वेळी देण्यात आले.

ज्यामुळे या मुलांना शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात वाटचाल करणे सोईस्कर होईल या दृष्टिकोनातून बजरंग दल पाऊल टाकतील असे आश्वासन देखील देण्यात आले.शाळेच्या नवीन बॅग हातात घेऊन शाळकरी मुलांचा आनंद गगनात मावेनासा झालेला. उपस्थित मुलांच्या पाल्यांना संतोष जी परदेशी व हर्षवर्धन कुऱ्हे यांनी शिक्षणाची आवड कशी जोपासावी यासाठी पालकांनी कसे आग्रही राहील पाहिजे जेणेकरून मुलांना शाळेत जाव वाटेल शिक्षण घ्यावं वाटेल या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन देखील केले.

याप्रसंगी बजरंग दलाचे ऋषिकेश कुऱ्हाडे,कुणाल भोंडवे, सचिन पठारे, सूरज धरम, हर्षवर्धन कुरहे, शिवराज संगनाळे, संतोष परदेशी, निरज कुऱ्हाडे, ऋषिकेश वाव्हळ, राजेश खराडे, राहुल शिंदे, अमित वाव्हळ, निरंजन शिंदे, प्रथमेश शिंदे, सिध्देश कुऱ्हाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
