कर्नाटक मधून मुंबईत विक्रीसाठी जात सल्ल्याची माहिती मिळताच सुसाट धावणाऱ्या गुटक्याने भरलेल्या ट्रक ला
पोलिसांनी आळेफाटा चौकात पकडले. यात ५५ लाख ८० हजारांचा गुटखा व १७ लाख रुपयांचा ट्रक असा एकूण ७३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

हि कार्यवाही शुक्रवारी मध्यरात्री आळेफाटा पोलिसांनी केली. चालक सर्फराज खाटीफ पाशा (रा.दुबालगुडी राज्य कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
कर्नाटक मधून के ए ३२ सी ४७८६ क्रमांकाचा आलेल्या ट्रक मध्ये गुटका वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती हवालदार उमेश भागात यांना मिळाली, त्यांनी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर सो. याना माहिती देत आळेफाटा चौकात सापळा लावून ट्रक पोलीस ठाणे मध्ये आणून तपासणी केली. यात गुटख्याची पोती आढळून आली

हि कार्यवाही पुणे ग्रामीणचे अधीक्षक मा.डॉ.अभिनव देशमुख सो.,अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री.मितेश घट्टे सो. ,उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर श्री.मंदार जवळे सो .,यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक आळेफाटा पोलीस स्टेशन श्री. प्रमोद क्षीरसागर सो.,सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर सो.,सहायक पो. फौ. चंद्रा डुंबरे ,पो.ह. उमेश भगत ,पो.ह. विनोद गायकवाड,पो.ना. पोपट कोकाटे, पो.शि .प्रवीण आढरी, पो.शि. मोहन आनंदगावकर, पो.शि. विकास सोनवणे यांनी केली आहे .

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!