नवी मुंबई :

नवी मुंबईतील सीवूडमध्ये असलेल्या बेथेल गस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चमधील आणखी तीन मुलींवर लैगिक अत्याचार झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या चर्चमध्ये असलेल्या अनधिकृत आश्रम शाळेवर महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्याभरापूर्वी धाड टाकत तेथून 45 मुला मुलींची सुटका केली होती. यापैकी तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी मागील महिन्यातच पास्टर राजकुमार येसुदासनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महिला व बाल विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सर्व मुलांचे काउन्सलिंग केल्यावर आणखी तीन मुलींनी आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या संदर्भात महिला व बालविकास विभागाचे जिल्हा बाल सौरक्षक अधिकारी रामकृष्ण रेड्डी यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पास्टर येसुदासन याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेने एकच खळबळ उडाली असून पालकांमधून आश्रमाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक आणि पालकांमधून होत आहे.

सुटका करण्यात आलेल्या 12 ते 14 वयोगटातील  तीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.  मुलीच्या अंगाला विक्स आणि तेल लावणे, त्यांना गुंगीची गोळी देऊन झोपवून ठेवले जात असल्याचे मुलींनी सांगितले आहे. यातील एका मुलीचा गर्भपात देखील केल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून मुलींच्या पालकांना भेटू न देण्याचे प्रकार समोर आले आहे.

बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चमध्ये  लहान मुले, मतीमंद महिला असून तेथे गैरप्रकार सुरू असल्याची माहिती ठाणे महिला बाल विकास विभागाला मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून 45 मुलांची सुटका  केली. या सर्वांना उल्हासनगर मधील शासकीय बालगृहात ठेवण्यात आले आहे.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!