नारायणगाव  :
जुन्नर तालुक्यातील नामांकित पैलवान कैलास उर्फ पिंटू गुलाब पवार (वय-३९, रा. निमगाव सावा, ता. जुन्नर) या तरुणाचा दि. ३ रोजी दुपारी मांजरवाडी येथे धारदार शस्त्राने वार करून निर्घृन खून करण्यात आला असल्याची घटना घडली आहे. याबाबत आधिक माहिती अशी की कैलास पवार हे मांजरवाडी येथे एका अंत्यविधी कार्यक्रमासाठी आले होते. अंत्यविधी झाल्यानंतर कैलास पवार व नातेवाईक असलेले संशयित तीन ते पाचजन हे मांजरवाडी येथील हॉटेलमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास चहापाण्यासाठी थांबले होते. त्यावेळी जुन्या भांडणातून कैलास पवार व त्यांच्यात वाद झाला.
त्यानंतर कैलास पवार हे बाहेर आले असता रस्त्यालगत असलेल्या मंदिरासमोरील झाडाजवळ संशयीतानी कैलास पवार याची छाती, पाठ व खांद्यावर धारदार शास्त्राने वार केले. या हल्ल्यात कैलास पवार हे गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच ते मयत झाले. याबाबत माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी रुग्णालयात भेट देऊन जमावाला शांत केले. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णाला ठेवण्यात आला आहे. रुग्णालयाबाहेर बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संशयित हल्लेखोरांची नावे पोलिसांना मिळाली असून आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!