बेल्हे :

किरकोळ कारणावरून बेल्हे गावात दोन गटात तुफान दगडफेक झाले असून , मिळालेल्या माहितीनुसार रात्रीचेजेवण करून मंदिर बघण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय तरुणावर ३० जणांच्या समूहाने लाकडी दांडके व लोखंडी रॉड नेपाठीवर व डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केले.

याबाबत अंकित ज्ञानेश्वर शिरतर याने फिर्याद दिली असून , अंकितच्या फिर्यादीवरून हुसेन बेपारी,मिराज नजीर बेपारी,पापा कुरेशी,अकिब नासीर बेपारी,सदाम कुरेशी, समिर कुरेशी,शाकीर बशीर बेपारी, अनसअली शराफत अली, जाकीर बेपारी, इम्रान कुरेशी व इतर १५ ते २० जण (सर्व रा.बेल्हा ) यांच्याविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आकिब नासिर बेपारी, मिराज नजीर बेपारी, समीर कादर बेपारी यांना अटक केली आहे.

तर दुसऱ्या फिर्यादीमध्ये हुसेन नजीर बेपारी त्याचे चुलते समीर कादर बेपारी हे दुचाकीवरून जात असताना गावातील फिरोज इनामदार व अनुष डावखर यांनी त्यांना कट का मारला असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. या झालेल्या वादातून हुसेन बेपारी व घरातील सदस्यांना ३१ जणांनी लाठ्या व दगडांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हुसेन नजीर बेपारीच्या फिर्यादीवरून रियाज फिरोज इनामदार, अनुज डावखर,अंकेत शिरकर,सागर ज्ञानेश्वर शिरतर, गणेश मसू गफले, प्रशांत जालिंदर बंडलकर,निलेश रामदास शिरतर,दर्शन दिलीप शेरकर,स्वप्निल बन्सी बोराडे,विपुल दिलीप शिरतर,किरण गंगाराम मंडले,सुरज लक्ष्मण शिरतर ,बाबू उर्फ प्रशांत धनवटे,अथर्व संजय भुजबळ, मन्या उर्फ विकास भुजबळ,चक्क्या उर्फ विकास शिरतर व इतर १० ते १५ जण(सर्व रा.बेल्हे ) यांच्याविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या मध्ये पोलिसांनी प्रशांत जालिंदर भंडलकर,आकाश उर्फ सागर ज्ञानेश्वर शिरतर, गणेश मसु गफले यांना अटक केली आहे.

या बाबत दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रार आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाली असून पुढील तपास आळेफाटा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बडगुजर करत आहेत.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!