ओतूर :

जिजाऊ सखी मंच कडून एक साडी तिच्यासाठी या उपक्रमाअंतर्गत आज ओतूर या ठिकाणी वस्तीवर साडी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला साडी घेताना आपली ही दिवाळी यंदा ही नवीन वस्त्रांनी होणार हा आनंद कुठे गगनात होता म्हणून सगळेच चेहरे आलेल्या पाहुण्यांकडे होते. हाच आनंद आणि ते समाधानकारक चेहरे पाहण्यासाठीच हा सगळा जिजाऊ सखी मंचचा अट्टाहास होता . सर्वांना साडी सोबत अजून ही तिथली परिस्थिती पाहता पुढील वस्तीवरील मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्याच्या बाबतीत लागेल ती मदत करण्याचे आश्वासन त्यांना जिजाऊ सखी मंचाच्या सौ. वृषाली नरवडे, वैशाली देवकर , निशा शेट्टी, अनुराधा सुपेकर, वर्षा गुंजाळ, मनीषा सोनवणे यांजकडून देण्यात आले.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!