जुन्नर :

ज्यांच्या विरोधात निवडणूक लढले त्यांना जाऊन मिळाले ही भूमिका योग्य नसून ही जनतेची फसवणूक आहे.ज्यावेळी संधी मिळेल तेव्हा जनता धडा शिकवेल असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केले. मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर होते.जुन्नर येथे बिरसा ब्रिगेडच्या वतीने आयोजित काळा चबुतरा अभिवादन दिनाच्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी हजेरी लावली असून आदिवासी बांधवांच्या मेळाव्याला संबोधित केल्यानंतर ते पुण्याला जात असताना मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांचे मंचर बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर स्वागत,सत्कार करण्यात आला.यावेळी शरद पवार गटाचे कार्यकर्ते व वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत त्यांचे स्वागत केले.यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की राज्याच्या राजकारणात काही बदल झाले असून सत्ता येथे सत्ता जाते मात्र जे सत्तेला चीटकुन राहण्यासाठी वेगळे निर्णय घेतात त्यांना जनता उत्तर देते.जनतेची मते घेऊन निवडून यायचे ज्यांच्या विरोधात निवडणूक लढले त्यांनाच जाऊन मिळायची ही भूमिका योग्य नसुन ही लोकांची फसवणूक आहे. राज्यात अनेक ठिकाणी अनेकांनी वेगळे निर्णय घेतले आहे मात्र संधी मिळेल तेव्हा जनता योग्य निर्णय घेईल पुढील वर्ष ते दीड वर्षात संधी मिळणार आहे. त्यावेळी काय करायचे हे मी सांगायची गरज नाही. तसेच आंबेगाव तालुक्यात लवकरच जाहीर सभा घेणार असून त्याबाबत मी व खासदार अमोल कोल्हे चर्चा करून तारीख लवकरच देवदत्त निकम यांच्याकडे सांगितली जाईल असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांच्यासमवेत खासदार डॉ.अमोल कोल्हे, शिरूरचे आमदार अशोक बापू पवार,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे देवदत्त निकम, बाळासाहेब बाणखेले,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव,उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश भोर,नित्यानंद येवले तसेच बाजार समितीचे संचालक मंडळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फैय्याज इनामदार
प्रतिनिधी

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!