पाथर्डी :

भाजप जिल्हाध्यक्षांनी जाहीर केलेल्या कार्यकारीणीतील शेवगाव पाथर्डी तालुक्यातील नियुकत्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. आधी जाहीर केलेली कार्यकारीणीत डावलल्यानंतर आमदार मोनिका राजळे यांच्या समर्थकांनी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांची भेट घेवून शेवगाव तालुक्याध्यक्ष व ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यांच्या नियुक्त्यांना स्थगिती मिळवली. त्यानंतर दुस-या गटाने पुन्हा भालसिंग यांची भेट घेवून दाद मागण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या नियुक्त्यांच्या निमीत्ताने तालुक्यातील भाजपची पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली आहे.भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी नियक्तीच दिलीप भालसिंग यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी नवीन जिल्हा कार्यकारीणीची घोषणा जाहीर केली. त्यामध्ये शेवगाव तालुक्यातील यांना संधी देण्यात आली. मात्र त्यामधील भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी पाथर्डीचे गोकुळ दोंड तर शेवगाव तालुकाध्यक्षपदी तुषार वैदय यांच्या नियुक्तीस आमदार राजळे यांच्या समर्थकांनी विरोध केला. त्यासाठी त्यांनी जिल्हाध्यक्ष भालसिंग यांच्याकडे धाव घेत या दोन्ही नियुक्त्यास स्थगिती मिळवली. राजळे समर्थक असलेले या पूर्वीचे तालुकाध्यक्ष असलेले ताराचंद लोढे यांच्या जागी भाजपचे दिवंगत ज्येष्ठ पदाधिकारी कै. शिवनाथ वैदय यांचे चिरंजीव तुषार वैदय यांनी संधी देण्यात आली. मात्र या नावास विरोध करत दोनशे राजळे समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाळकी येथे भालसिंग यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी दौंड व वैदय यांच्या नियुक्त्यांना स्थगिती दिली. मात्र या प्रकारानंतर शेवगाव पाथर्डी तालुक्यातील सातशे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाळकी येथे भालसिंग यांची भेट घेवून जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यामध्ये गोकुळ दौंड, तुषार वैदय, बाळासाहेब सोनवणे, गणेश कराड, अमोल सागडे, संजय मरकड, गुरुनाथ माळवदे, अर्जुन ढाकणे, अंबादास ढाकणे आदींचा समावेश होता. मात्र या नियुक्त्यांच्या निमीत्ताने भाजपमधील शह कटशहाचे राजकारण रंगल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसापासून शेवगाव तालुक्यातील भाजमध्ये अंतर्गत गटबाजी आहे. ती या निमीत्ताने पुन्हा एकदा उफाळून आली आहे. केंदात व राज्यात सत्तेवर असलेल्या व खासदार व आमदार दोन्ही लोकप्रतिनिधी असलेल्या पक्षामध्ये हा अंतर्गत कलह निवडणुकीच्या निमीत्ताने पुन्हा तीव्र झाल्याने त्याचा फटका मात्र पक्षाला बसण्याची चिन्हे आहेत. याबाबत पक्षश्रेष्ठी काय भुमिका घेतात याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

अत्यंत अडचणीच्या काळात व सत्तेत नसतांना वडील स्व. शिवनाथ आण्णा वैदय यांनी आपले आयुष्य पक्षासाठी खर्ची घातले. मात्र जनाधार असतांना देखील काही ठराविक लोकांच्या आग्रहास्तव आपल्या नावास विरोध केला जात आहे. तालुक्यातील निष्ठावान व जुन्या कार्यकर्त्यांची ही अवहेलना असून त्याची श्रेष्ठींनी दखल घ्यावी. तसेच पक्षश्रेष्ठींनी समन्वयाने निर्णय घ्यावा. ( तुषार वैदय – पदाधिकारी भाजप शेवगाव ) लोकप्रतिनिधींच्या विरोधात व पक्षविरोधी भुमिका घेणा-य़ा जिल्हा कार्यकारीणीतील तीन नावाला पदाधिका-यांनी विरोध केलेला आहे. तर पाथर्डी व शेवगाव तालुकाध्यक्षांच्या निवडीची घोषणा झालेली नाही. तालुक्यातील कोणत्याही नावास आमदार राजळे व पदाधिका-यांचा विरोध नसुन फक्त समन्वयाने व सर्व सहमतीने निर्णय घ्यावा अशी आमची भुमिका आहे.

मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!