शेवगाव :
शेवगाव-पाथर्डी तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.शेतकऱ्याने शेतामध्ये पेरणी व खत फवारणीसाठी कर्ज काढून शेतीची मशागत केली आहे ऐनवेळी वरूणराजाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे शेतामधील पीक करपले आहे .तालुक्याचे अर्थचक्र मंदावले आहे.कोणताही लोकप्रतिनिधी आमच्या शेतकरी बांधवांची दखल घेत नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीने शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी व शेवगाव-पाथर्डी या दोन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी, आस्मानी -सुलतानी संकटांनी पिचलेल्या बळीराजाला दिलासा द्यावा या प्रमुख मागण्यांसाठी आज पाथर्डी येथील प्रांत कार्यालयासमोर लक्षवेधी निदर्शने करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसनराव चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.आंदोलन यशस्वितेसाठी जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, पाथर्डी तालूकाध्यक्ष भोरूशेठ म्हस्के यांनी विशेष मेहनत घेतली
मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
