शेवगाव :
पाथर्डी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती गोकुळ भाऊ दौंड यांच्या वाढदिवसानिमित्त सहा तारखेला पाथर्डी येथे तरुण पैलवानासाठी भव्य कुस्तीच्या आयोजन केले आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील होतकरू पैलवानांना एक व्यासपीठ तयार करून दिले आहे.या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. गोकुळ भाऊ दौंड यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून अनेक वेळा सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करत असतात.मागील वर्षी वाढदिवसानिमित्त कोरडगाव येथील पूरग्रस्तांना किराणा मालाचे वाटप करून त्यांचे पुनर्वसनाचे काम दौंड यांनी केले होते.यावर्षी त्यांनी आगळावेगळा कार्यक्रम इतर खर्चाला फाटा देऊन समाजात वाढदिवसानिमित्त आदर्श घालून दिला आहे.
मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर