आळेफाटा ( वार्ताहर )

13 वी अखिल भारतीय कमांडो स्पर्धा तसेच तिसरी अखिल भारतीय स्नायपर स्पर्धा एन एस जी मानेसर हरियाणा येथे आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारताचे पोलीस प्यारा मिलिटरी आर्मी या सर्व फॉर्सेसने सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा दिनांक 24 मार्च 2023 ते 28 मार्च 2023 पर्यंत होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस टीमने (फोर्स वन )सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे अपर पोलीस महासंचालक श्री कृष्ण प्रकाश यांनी टीमचे अभिनंदन करून स्नायपर ट्रॉफी गोल्ड मेडल एक लाख रुपये रिवार्ड दिलेला आहे.यामध्ये पोलीस नाईक 1106 अभिषेक अनंत पादीर नेमणूक स्नायपर टीम महाराष्ट्र राज्य मुंबई येथे गेल्या दहा वर्षापासून कार्यरत आहे.आपल्या चपळ कामगिरी व अथक परिश्रमाच्या बळावर स्नायपर ट्रॉफी वर आपले नाव कोरले आहे.

अत्यंत गरिबीच्या, हलाखीच्या परिस्थितीतून ग्रामीण भागात आपले शिक्षण पूर्ण करून देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी महाराष्ट्र पोलीस मधून फोर्स वन या शाखेत जाण्यासाठी दोन महिने जीसीपीसी GCPC तसेच तीन महिने एसीपीसी ACPC खडतर असे प्रशिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र पोलीस अंतर्गत फोर्स वन कमांडो या पदावर कार्यरत आहे

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!