मुंबई :

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात ०३ फेब्रुवारी ते ०५ फेब्रुवारी २०२३ यादरम्यान वार्षिक उद्यान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यंदाच्या उद्यान प्रदर्शनाचे आणखी एक आकर्षण होते आहे. फुलांपासून साकारलेले ‘जी २०’ चे बोधचिन्ह. त्याचबरोबर ‘जी २०’ सदस्य देशांमधील झाडे फुले आणि भाज्या यांचा समावेश देखील यंदाच्या उद्यान प्रदर्शनात समावेश करण्यात आला अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीच्या बागेत आयोजित होणा-या उद्यान प्रदर्शनाचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते ०३ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले.
नैसर्गिक सेल्फी पॉईंट : दरवर्षी एक मध्यवर्ती संकल्पना घेऊन महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे आयोजित होणारे ‘वार्षिक उद्यान प्रदर्शन’ आता मुंबईची एक ओळख बनली आहे. लहान मुलांच्या भाव विश्वाचा भाग असणारे कार्टून्स या वर्षीच्या उद्यान प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना होती.या अंतर्गत पाना – फुलांपासून तयार केलेल्या विविध कार्टून्सच्या प्रतिकृती यंदाच्या उद्यान प्रदर्शनात होत्या.त्याचबरोबर पाना-फुलांपासून तयार केलेले अनेक ‘सेल्फी पॉइंट’ देखील यंदाच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण होते.

प्रदर्शनात दुर्मिळ वनस्पती : यासोबतच कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय यांचे अक्षरशः शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पहायला मिळाल्या. तसेच मुंबई परिसरात अत्यंत दुर्मिळ असणा-या कृष्णवडासारख्या अनेक दुर्मिळ देशी प्रजातींची झाडे देखील यंदाच्या प्रदर्शनात ‘याची देही, याची डोळा’ बघता आल्या.
यंदा कार्टून थीम : कोविड प्रादुर्भावामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर होत असलेले यंदाचे उद्यान प्रदर्शन हे अधिक संस्मरणीय व्हावे, यासाठी महापालिकेच्या उद्यान खात्यातील अधिकारी व कर्मचारी अक्षरशः दिवस-रात्र मेहनत घेतली.याच मेहनतीतून पाना – फुलांपासून तयार केलेल्या विविध कार्टून्सच्या प्रतिकृतींसह विविध प्रकारच्या प्रतिकृती या प्रदर्शनास अनुभवायला मिळाल्या.

या कार्टूनचा असणार समावेश : या वर्षीच्या मोहस्तवाची थीम ऐकूनच कदाचित अनेक लहानग्यांची पावले राणीच्या बागेकडे वळाली.मुलांची आवडती पेपा पिग फॅमिली, माशा अँड द बियर, ब्लुई, ट्वीटी आणि सिल्व्हेस्टर यांच्यासह नानाविध कार्टून्स चा समावेश होता.विशेष म्हणजे ही सर्व कार्टून्स पानाफुलांपासून साकारली होती.ह्या प्रदर्शनाचे उत्तमोत्तम नानाविध मनाला भुरळ घालणाऱ्या फोटोंचे संकलन आणि याबाबतची माहिती कु वैष्णवी जयसिंग शिंदे ह्यांनी दिली.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!