पिंपरी चिंचवड :

हौशी आणि अतिउत्साही बुलेट राजांवर  पिंपरी चिंचवड पोलिसांची करडी नजर असल्याचं चित्र आहे. या बुलेट राजांवर पिंपरी-चिंचवडमध्ये  वाहतूक पोलिसांकडून कडक दंडात्मक करावाई करण्यात येत आहे. शुक्रवारी एका दिवसांत पोलिसांनी कर्कश आवाज 195 बुलेटराजांवर कारवाई केली आहे आणि त्यांच्याकडून 99 हजार 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटराजांना पोलिसांनी चांगलंच धारेवर धरल्याचं दिसून येत आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये यापूर्वी अशा बुलेट राजांवर आता थेट गुन्हे दाखल केले गेले. मागील सहा महिन्यात वीस हजार बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वीस लाखांचा दंडही त्यांच्याकडून वसूल करण्यात आला. मात्र तरीही बुलेट राजांमध्ये सुधारणा होईना, म्हणून थेट गुन्हे दाखल करण्याची मोहीम वाहतूक पोलिसांनी हाती घेतली होती. वाहन जप्ती आणि परवाना रद्द करण्याच्या दृष्टीनेही पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस पावलं उचलत आहेत. त्यात आता पुन्हा पोलिसांची त्यांच्यावरच नजर असल्याचं समोर आलं आहे.

यापूर्वी तब्बल 22 लाखांचा दंड वसूल
पिंपरी-चिंचवड शहरातून सायलेन्सर बदलून बुलेट चालवल्या जातात आणि लोकांना फार याचा त्रास होत आहे, अशा तक्रारी आल्या होत्या. हा प्रकार आमच्या देखील निदर्शनास आला. मागील सहा महिने आपण बुलेटवर कारवाई केल्या. त्यात 22 लाखांचा दंड वसूल केला तरी काही चालकांमध्ये फरक पडलेला नाही. मॉडिफाय करण्यासोबतच, पर्यावरणाचा ऱ्हास करणे, यावरुन कारवाई केली जात आहे. आतापर्यंत दंडात्मक कारवाई केली होती. मात्र तरुणांची वागणूक पाहता आता आम्ही गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच हा प्रकार थांबला नाही तर वाहन देखील जप्त करण्याच्या विचारात आम्ही आहोत. त्यामुळे तरुणांनी नियमांचं पालन करावं नाहीतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

बुलेट मॉडिफाय करणं भोवणार?
बुलेटला वेगळा सायलेन्सर बसवतात. त्यामुळे शहरातील अनेक भागात ध्वनी प्रदूषण होतं. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ध्वनी प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासोबतच वायु प्रदूषणाचा प्रश्नदेखील कायम आ वासून उभा असतो. त्यामुळे दोन्ही शहरात अनेकदा या प्रकारची कारवाई करण्यात आली होती. अनेक वेळा वेगवेगळे प्रश्न आणि समस्या निर्माण करताना हे तरुण कायम दिसतात. यावरुन यंदा पोलिसांनी अतिहौशी तरुणांना चांगलाच धडा शिकवण्याचं ठरवलं आहे.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!