आळेफाटा ( वार्ताहर ) :

गेल्या काही वर्षी क्रमांक 1 वर असलेले जिओ नेटवर्कला घरघर लागली असून आळेफाटा, ओतूर सह जुन्नर तालुक्यात जिओच्या नेटवर्क सर्व्हिस आऊट ऑफ रेंज झाल्याने जिओ वापरकर्त्यांना नाहक त्रास होत आहे. इंटरनेट सर्व्हिस केवळ नामधारी 5 जी सर्व्हिस असून इंटरनेट अतिशय स्लो गतीने चालत आहे. कॉलिंग सुविधेचे अक्षरशः गेल्या काही महिन्यांपासून वाभाडे निघाले असून जिओ नेटवर्क वापरकर्ते एअरटेल व वोडाफोन आयडिया कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर पोर्ट करत आहे. वर्षभर फुकट सर्व्हिस देऊन ग्राहकांना गुलाम करणाऱ्या जिओ कंपनीमध्ये रिचार्जच्या किंमतीत प्रचंड वाढ होऊनही जिओ कॉलिंग आणि इंटरनेट उत्तम सर्व्हिस देण्यात नियमितता राखण्यात सपशेल अपयशी ठरलेली आहे. पुढील पंधरवड्यात जिओ सर्व्हिस देण्यात असक्षम ठरल्यास जिओ कपंनीचे टॉवर्स जुन्नर तालुक्यातून हद्दपार करणार असल्याची जाहीर घोषणा जिओ वापरकर्त्यांनी केली

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!