दिल्ली :
दक्षिण दिल्लीतील मेहरौली भागात श्रद्धाच्या हत्याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. या तरुणाचं नाव आफताब असून तो मृत श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. तसेच मृतदेहाचा दुर्गंध येऊ नये म्हणून त्याने एक फ्रीझर विकत घेतला आणि त्यात मृतदेहाचे तुकडे ठेवले ल्याची माहिती आफताबने पोलीस चौकशीत दिली आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान आफताबने सांगितले की, त्याने फ्रीजरमध्ये ठेवलेले मृतदेहाचे तुकडे दररोज पॉलिथिनमध्ये भरून मेहरौलीच्या जंगलात नेऊन वेगवेगळ्या दिशेने फेकले. रात्रभर जंगलात फिरणारे प्राणी ते तुकडे खातील आणि श्रद्धाच्या हत्येची कोणालाच कल्पना येणार नाही असा आफताबचा समाज होतो
कसा झाला हत्येचा खुलासा?
श्रद्धाने बऱ्याच काळापासून फेसबुकवर पोस्ट टाकली नाही, त्यामुळे तिच्या मैत्रिणींना संशय आला. याबाबत त्यांनी श्रद्धाच्या पालकांना माहिती दिली. श्रद्धाचे कुटुंबीय मुंबई पोलिसांपर्यंत पोहोचले तेव्हा मुंबई पोलिसांनी हे दिल्लीचे प्रकरण असल्याचे सांगितले. यानंतर कुटुंबीयांनी दिल्लीतील मेहरौली पोलीस ठाणे गाठून येथे लेखी तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आफताबला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली. या चौकशीत अफताबने संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे.
दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते
फताब आणि श्रद्धा सात ते आठ महिन्यांपूर्वी मुंबईहून दिल्लीत आले होते आणि दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते अशी माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली आहे. या दरम्यान श्रद्धा आफताबवर लग्नासाठी सतत दबाव आणत होती. दोघांमध्ये 18 मे रोजी या प्रकरणावरून जोरदार भांडण झाले. हा वाद इतका वाढला की आफताबने श्रद्धाचे नाक आणि तोंड दाबले, श्वास कोंडल्याने तिचा गुदमरून मृत्यू झाला.
जंगलात फेकलेले मृतदेहांचे तुकडे
श्रद्धाचा मृत्यू झाल्यानंतर आफताब घाबरला. यानंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावायचे ठरवले. आफताबने धारदार शस्त्राने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि त्याचा दुर्गंध येऊ नये म्हणून त्याने बाजारातून फ्रीज आणला. मृतदेहाचे सर्व तुकडे फ्रीजमध्ये ठेवले. यानंतर तो रोज रात्री एक ते दोनच्या दरम्यान मेहरौलीच्या जंगलात जाऊन तुकडे फेकत होता.
