एडिलेड:

अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली आहे. टीम इंडियाने बांग्लादेशवर 5 धावांनी विजय मिळवला. सेमीफायनलमध्ये प्रवेशासाठी टीम इंडियाला आज विजय आवश्यक होता. या विजयामुळे टीम इंडियाचा पुढचा मार्ग सुकर झालाय. आजच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे सामना 20 ऐवजी 16 षटकांचा करण्यात आला.

बांग्लादेशचा कॅप्टन शाकीब अल हसनने टॉस जिंकून टीम इंडियाला पहिली बॅटिंग दिली. टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 184 धावा केल्या होत्या. बांग्लादेशला विजयासाठी 185 धावांची गरज होती. पण या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला.

पावसाच्या व्यत्ययामुळे टार्गेट बदलल

त्यामुळे सामना 20 ऐवजी 16 षटकांचा करण्यात आला. बांग्लादेशला विजयासाठी 16 षटकात 151 धावांच टार्गेट देण्यात आलं. त्यावेळी त्यांना 9 ओव्हर्समध्ये 85 धावांची गरज होती. बांग्लादेशचा एकही विकेट गेला नव्हता.

लिट्टन दासने चांगली सुरुवात दिली होती

खरंतर बांग्लादेशने या सामन्यात दमदार सुरुवात केली होती. त्यांच्या 7 ओव्हर्समध्ये बिनबाद 66 धावा झाल्या होत्या. बांग्लादेशची सलामीची जोडी मैदानात होती. लिट्टन दासने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने भारतीय गोलंदाजीवर हल्लोबल केला. लिट्टन दासने 26 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या होत्या. त्याने 7 फोर आणि 3 सिक्स लगावले होते. नजमुल शांतो 7 धावांवर नाबाद होता. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी या सगळ्याच वेगवान गोलंदाजाचा त्याने समाचार घेतला.

पावसानंतर बांग्लादेशची घसरण

पण पावसानंतर सामना सुरु झाल्यानंतर लिट्टन दासच्या रुपात त्यांना पहिला झटका बसला. केएल राहुलने लांब अंतरावरुन केलेल्या थ्रो वर लिट्टन दास 60 धावांवर रनआऊट झाला. त्यावेळी बांग्लादेशच्या 68 धावा होत्या. त्यानंतर नजमल शांतोला मोहम्मद शमीने 21 धावांवर सूर्यकुमार यादवकरवी कॅचआऊट केलं.

हसन आणि अहमदच्या फटकेबाजीमुळे रंगत

12 व्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंहने बांग्लादेशला दोन झटके दिले. त्यानंतर ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद झाले. अखेरीस नुरुल हसन नाबाद 25 आणि तस्कीन अहमदने 12 फटेकबाजी करुन सामन्यात रंगत आणली. पण लास्ट ओव्हर टाकणाऱ्या अर्शदीपने बांग्लादेशला विजय मिळू दिला नाही. बांग्लादेशने 16 ओव्हरमध्ये 6 बाद 145 धावा केल्या.

 

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!