ओतूर

ओतूर शहरात मुस्लिम समाज आणि समस्त ग्रामस्थ ओतूर यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात आणि शांततेत पार पाडली गेल्या बारा दिवसापासून चाललेल्या कार्यक्रमांमध्ये जामा मस्जिद ओतूर, शाही सुंनी मज्जिद ओतूर, त्याचप्रमाणे दस्तूर खान बाबा दर्गा या ठिकाणी मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आणि त्यांनी सांगितलेल्या इस्लाम जीवन पद्धतीवर मजलीस चा कार्यक्रम झाला त्यामध्ये दोन्ही मस्जिद च्या इमामांनी मार्गदर्शन केले

मिरवणूकिंनंतर झालेल्या कार्यक्रमात विनायक शेठ तांबे, लक्ष्मण शिंदे, ओतूर पोलीस स्टेशन चे Api कांबळे साहेब यांनी समाजाला मार्गदर्शन केले
त्याच प्रमाणे हाजी चांद शेठ मोमीन आणि सहकारी यांच्या मार्गदर्शनानुसार रशीद मोमीन, शफी मोमीन ,रज्जाक इनामदार ,आणि समाजातील सर्वं तरुण मंडळींनी ईद मिलाद ची मिरवणूक काडून समाजाला प्रेम आणि शांततेचा संदेश दिला

प्रतिनिधी :- फैयाज इनामदार

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!