
मुंबई :
काही दिवसांपूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. यानंतर आता मुंबईमध्ये गुरुवारपासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून सुटे दूध प्रतिलिटर सात रुपयांनी महागणार आहे. जनावराच्या चाऱ्याचा खर्च वाढला आहे म्हणून ही दरवाढ करण्यात आली आहे.
चाऱ्याचा खर्च वाढल्याचा फटका दूध उत्पादकांना बसत असल्यामुळे ही वाढ करण्यात आली आहे. परिणामी दूध उत्पादकांनी सुट्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.
सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये महागाईची झळ सर्व सामान्यांना सोसावी लागणार आहे. दुधाचे दर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मुंबईत 1 तारखेपासून सुटे दूध सात रुपयांनी महागणार आहे.
काही दिवसांपूर्वीच अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर आता मुंबईत सुट्या दुधाचे दर वाढणार आहेत. मुंबईत 1 सप्टेंबरपासून सुटे दूध 7 रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे एक लिटर दुधासाठी ग्राहकांना आता 80 रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ 1 सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. हे नवे दर 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असतील.
सणासुदीचा काळात हि दरवाढ सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडणारी नसून या मध्ये राज्य व केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सर्वसामान्यच्या खिशाला कातर बसणार नाही अशी भावना जनतेमधून येत आहे.
