भगवानगड ( बीड )
श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट वेद बोलाविलेला श्री रेडा समाधी मंदिर श्री क्षेत्र आळे, संतवाडी, कोळवाडी या देवस्थानचा 2024 कॅलेंडरचा (दिनदर्शिका )प्रकाशन सोहळा श्री क्षेत्र भगवानगड येथील महंत श्री नामदेवजी महाराज शास्त्री यांच्या शुभहस्ते श्री क्षेत्र भगवानगड येथे संपन्न झाला . श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट वेद बोलाविलेला श्री रेडा समाधी मंदिर श्री क्षेत्र आळे, संतवाडी, कोळवाडी या देवस्थानचा 2024 कॅलेंडरचा (दिनदर्शिका )प्रकाशन सोहळा श्री क्षेत्र भगवानगड येथील महंत मा.श्री नामदेवजी महाराज शास्त्री यांच्या शुभहस्ते श्री क्षेत्र भगवानगड येथे संपन्न झाला .
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा परिषद मा. सदस्य मा. प्रसन्नआण्णा डोके,मा.संदीपजी निमसे ( अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट ) तसेच उपस्थित विश्वस्त मंडळ व आळे गावचे पदाधिकारी मा. रविंद्रशेठ (चेअरमन ) गुंजाळ,मा. चारूदत्तजी साबळे, श्री कान्हू पाटील कुऱ्हाडे, मा.संतोषशेठ पाडेकर, मा.अमोलजी भुजबळ, मा.डॉ.बाळासाहेब जाधव,मा. पांडुरंगजी डावखर,मा.सुनीलशेठ जाधव,मा. गणेशजी शेळके,मा. दिनकरशेठ राहिंज, मा.संजयजी खंडागळे, मा.पप्पूशेठ डोंगरे,मा. पवनजी डोके,मा. गणेशजी गुंजाळ हे मान्यवर उपस्थित होते .
श्री क्षेत्र भगवानगड येथे अंदाजे 25 कोटी रुपये खर्च करून श्री ज्ञानेश्वर माउलींच्या मंदिराचे संपूर्ण दगडी काम चालू आहे,त्याच धर्तीवर आपल्याही देवस्थानच्या विनामंडपाचे दगडी काम करावायचे असल्यामुळे याबाबत करावायच्या सर्व कामाबाबत शास्त्री महाराजांनी मार्गदर्शन केले,महंत शास्त्री महाराज यांनी आपल्या देवस्थानच्या कामाचे कौतुक करून कॅलेंडर प्रकाशन सोहळा शुभस्ते संपन्न केला, यावेळी महाराजांचा सन्मान देवस्थानच्या वतीने करण्यात आला,तसेच शास्त्री महाराजांनी लवकरच आपण श्री रेडा समाधी मंदिरास भेट देणार असल्याचे सांगितले, यावेळी आपल्या देवस्थानची सर्व माहिती मा.कान्हू पाटील कुऱ्हाडे यांनी दिली व आभार मा. पांडुरंगजी डावखर यांनी मानले