आळेफाटा वार्ताहर :
मोकसबाग (वडगाव कांदळी) येथील शिवचिदंबर मंदिरात चिदंबर स्वरूप परमपूज्य भाऊ व वंदनीय परमपूज्य ताई यांच्या कृपाशीर्वादाने भगवान अवतार शिवचिदंबर महास्वामी यांचा कल्याणोत्सव शुभविवाह सोहळा याचे सोमवार दि 18 डिसेंबर चंपाषष्टीच्या शुभमुहूर्तावर करण्याचे आयोजिले आहे.यावेळी रविवार दि 17 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता हळदी समारंभ, दुपारी 4.30 वाजता सिमंती पूजन, सोमवार दि 18 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून पुढे मांडव डहाळे, रुखवत, मिरवणूक, कल्याणोत्सव शुभविवाह सोहळा मोठ्या उत्साहात भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तसेच ह भ प महेश महाराज खाटेकर राहुरी यांच्या माध्यमातून सकल संतचरित्र कथायज्ञ बुधवार दि 13 डिसेंबर ते रविवार दि 17 डिसेंबर सायंकाळी 6 ते 9 यावेळेत त्यानंतर महाप्रसाद दरम्यान असे कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.सदर कार्यक्रमाचे आयोजन चिदंबर सेवा समितीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याबाबतची माहिती ह भ प रामदास महाराज मोरे यांनी दिली.
