पुणे :
डान्सर गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. गौतमी पाटील गेल्या वर्षभरापासून चांगलीच चर्चेत आली आहे. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात अनेकदा गोंधळ झाल्याची बातमी समोर येत असते. तिच्या कार्यक्रमावेळी कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा देखील फौजफाटा कार्यक्रमस्थळी तैनात असतो. गौतमीचा कार्यक्रम पाहायला तिच्या चाहत्यांची तुफान गर्दी असते. गौतमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिच्या ग्रुपमधील एक डान्सर हिंदवी पाटील हिने एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली होती. हिंदवी आता स्वत: गौतमी सारखे कार्यक्रम करते. ती स्वत: एका डान्सर ग्रुपचं नेतृत्व करते, अशी चर्चा सुरु असते. याबाबत गौतमी पाटील हिला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने भूमिका मांडली.
गौतमी पाटील हिचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गौतमी पाठोपाठ हिंदवी पाटील हिचेदेखील डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असतात. गौतमी प्रमाणेच हिंदवी हिच्या डान्स व्हिडीओवरदेखील चाहत्यांचा लाईक्सचा पाऊस पडतो. याशिवाय गौतमी पाटील आणि हिंदवी पाटील हे आता व्यावसायिक दृष्टीकोनाने प्रतिस्पर्धी झाले आहेत. त्यामुळे तिने गौतमीच्या डान्स ग्रुपला सोडचिठ्ठी दिल्याने गौतमीचं काही नुकसान झालं का? किंवा गौतमी त्यातून नाराज झाली का? याबाबत चाहत्यांमध्ये चर्चा सुरु असते. असं असताना आता गौतमीने हिंदवी हिच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलंय.
गौतमी हिंदवी हिच्याबद्दल नेमकं काय म्हणाली ?
गौतमीला डान्सर हिंदवी पाटील हिच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गौतमीने हिंदवीला शुभेच्छा दिल्या. “मी 11 वर्षांपासून या क्षेत्रात काम करते. अनेक मुली माझ्या हाताखालून गेल्या आहेत. हिंदवी पाटीलचं चांगलं होवो. आमच्यातून कोण फुटून गेलं तर आम्ही त्याला गद्दार अजिबात म्हणत नाही. उलट त्यांचं चांगलं होऊ दे”, असं गौतमी पाटील म्हणाली.