गंगापूर :
छत्रपती संभाजी नगर गंगापूर तालुक्यात शिपुर शेदूरवाद भागात नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या ८ हायवा ट्रक वर मा.उपविभागीय अधिकारी श्री. अरुण जऱ्हाड यांनी दि 8. नोव्हेंबर बुधवार रोजी दुपारी गंगापूर मौजे शिवपुर शिवारात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाच्या ठिकाणी जाऊन जाय मोक्यावर कारवाई केली 1.वाळूने भरलेला हायवा व 7. वाळू भरण्यास आलेल्या हायवा अशा एकूण 8. हायवाट्रक शिपुर नदीपात्रातून गंगापूर तहसिल कार्यालय येथे नेऊन लावण्यात आले.
अधिकारी व पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात हायवाट्रक घेऊन जात असताना दिसून आले कार्यवाही तहसिलदार श्री.सोनी सर, अपर तहसिलदार दहाडदे, नायब तहसिलदार खैरनार,मंडळ अधिकारी हूग्गे,तलाठी लोने,राठोड, काथार,कराळे इ. तहसिल कार्यालयामार्फत दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. गंगापूर तहसील कार्यालय येथे बेकायदेशीर अवैध उत्खनन प्रकरणी जप्त करण्यात आलेल्या 8. हायवाट्रक मालक.विनायक पाटील संभाजीनगर,योगेश विठ्ठल निकम,अशोक दाने वाळूज, संदीप पवार,जूनैद हबीब शेख संभाजीनगर,नवनाथ अर्गडे,रामेश्वर भाऊसाहेब शेळके धामुरी,जुनैद हबीब शेख संभाजीनगर,अशाप्रकारे 1-7 वाहने जाय मोक्यावर भरण्यासाठी आल्याचे आढळून आले.पोलीस पाटील शिवपूर यांना कर्तव्यात कसूर केल्याबाबत निलंबित करण्यात आले आहे.
पोलीस कर्मचारी श्री.सतिश हंबर्डे यांची मा.जिल्हाधिकारी छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे गौण खनिज कार्यवाहीच्या कर्तव्यात असताना मा.उपविभागीय अधिकारी यांच्याशी कारवाईत सहकार्य न करता हुज्जत घातल्याने त्याच्यावर तक्रार करण्यात आली आहे.तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे मा.उपविभागीय अधिकारी श्री अरुण जऱ्हाड सर यांनी केलेल्या कार्यवाहीने वाळू माफीयांचे धाबे दणाणले असून या परिसरातील आतापर्यंतची सर्वाधिक मोठीं कार्यवाही मानली जात आहे.
मधुकर बर्फे
प्रतिनिधी
