ओतुर :

मौजे भोरवाडी (हिवरे बु), ता. जुन्नर, जि. पुणे येथील विनायक सिताराम भोर, वय ४२ वर्षे सध्या रा.ओझर (नवीन गावठाण) यास दारू पिण्याचे व्यसन असुन काही एक कारण नसताना घरात आई- वडील यांना शिवीगाळी दमदाटी करून मारहाण करत होता. दिनांक ३१/८/२०२३ रोजी रात्री ९.०० वा. चे सुमारास विनायक भोर हा दारू पिवुन घरी आला असुन तो काही एक कारण नसताना आई वडीलांना शिवीगाळ दमदाटी करू लागल्याने आईने त्यास “तु काही कामधंदा करत नाही, तुला आम्ही काही बोलत नसताना सुद्धा तु आम्हांला शिव्या का देतो” असे म्हणाल्याचे कारणावरून विनायक भोर याने आईचे डोक्याचे केस हाताने पकडुन घरात पडलेल्या काठने आईचे पायावर मारहाण केली अशी फिर्याद आई सौ. सखुबाई सिताराम भोर, वय ७५ वर्षे, रा. भोरवाडी (हिवरे बु), ता. जुन्नर, जि. पुणे सध्या रा. ओझर (नवीन गावठाण) यांनी ओतुर पोलीस स्टेशन येथे दिले फिर्यादी जबाबावरून विनायक सिताराम भोर याचे विरुद्ध गु.र.नं. ४६१ / २०२३ भा.दं.वि.क. ३२४, ३२३, ५०४,५०६ प्रमाणे दि.३१/८/२०२३ रोजी गुन्हा दाखल आहे.दाखल गुन्हयाचे अनुशंगाने विनायक सिताराम भोर अटक करण्यात आली असुन दि. १/९/२०२३ रोजी मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो., जुन्नर यांचे समोर हजर केले असता मा. कोर्टाने आरोपीची मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये मध्यवर्ती कारागृह येरवडा येथे रवानगी केली आहे. दाखल गुन्हयाचा तपास स. पो. नि. एस.व्ही. कांडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार . बी. ए. भवारी करत आहेत.

फैय्याज इनामदार
तालुका प्रतिनिधी जुन्नर

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!