पुणे  :

आपल्याकडे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते पवित्र समजले जाते. आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षक नेहमी प्रयत्न करत असतात. त्यामुळे विद्यार्थीही शिक्षकांचे नेहमी आदर करतात. यामुळे शिक्षकी व्यवसायसारखे समाधान इतर कोणत्याही व्यवसाय मिळत नाही. कारण देशातील अनेक मोठ्या व्यक्तींना त्यांच्या गुरुंनीच घडवले आहे. परंतु या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना पुणे शहरातील मुंढवा परिसरात घडली आहे. एका ४० वर्षीय शिक्षकाने लहान असलेल्या विद्यार्थिनीसोबत नको तो प्रकार केला आहे.

काय आहे प्रकार

घोरपडी येथे राहणार अलोक सर (वय ४०) हा एका विद्यार्थीनीची शिकवणी घेण्यासाठी घरी जात होता. ती विद्यार्थीनी घरी एकटीच असल्याचा फायदा घेऊन जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध तयार केले. विद्यार्थीने विरोध केल्यानंतर तिला धमकवत हा प्रकार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या लहान भावाला मारुन टाकेल, अशी धमकी दिली. यामुळे विद्यार्थीने चांगली घाबरली. तिने हा प्रकार कोणालाच सांगितला नाही. त्यानंतर तो शिक्षक नेहमीप्रमाणे शिकवण्यासाठी येत होता.

असा उघड झाला प्रकार

विद्यार्थीनी मासिक पाळी चुकली. यामुळे तिच्या घराच्या मंडळींनी तिला डॉक्टरांकडे नेले. त्यावेळी ती गर्भवती राहिल्याचे समजले. त्यानंतर अलोक सरांसंदर्भातील प्रकार तिने सांगितला. अखेरी मुंढवा पोलिसांत अलोक सराविरोधात तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अलोक सरांना अजून अटक केली नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुणे शहरातील या धक्कादायक प्रकारामुळे विद्यार्थीनीच्या पालकांनाही चांगलाच धक्का बसला आहे. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!