श्रीहरिकोटा :

भारताच्या ‘चांद्रयान-3’ (Chandrayaan-3)  या महत्त्वाकांक्षी मिशनने आज आकाशात यशस्वी उड्डाण केलं. भारताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेतली. ‘काउंट डाऊन’ संपताच ज्वाळांचे लोट खाली सारत इस्रोच्या ‘बाहुबली रॉकेट’ म्हणजेच LVM-3 मधून चांद्रयान-3 वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावला. आसमंत हादरवणाऱ्या रॉकेटच्या आवाजात टाळ्या-शिट्ट्यांसह ‘भारत माता की जय’च्या घोषणाही निनादल्या. मात्र यातच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दोन तरुण महत्त्वाची आणि अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. या मोहिमेत असिफभाई महालदार आणि मयुरेश शेटे यांचं योगदान आहे. असिफभाई महालदार हे रिलायन्स फायर सिस्टीम या कंपनीत आहे तर  मयुरेश शेटे हे इस्त्रोत शास्त्रज्ञ आहे.

भारतासाठी अभिमानास्पद क्षण होता. अनेक भारतीयांचं या मोहिमेकडे लक्ष लागलं होतं. मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावरदेखील या मोहिमेची चर्चा झाली. या पूर्वी झालेलं उड्डाण अपयशी ठरल्यामुळे या उड्डाणाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र या दोघांच्या कामगिरीमुळे जुन्नरकरांचा उर भरुन येत आहे.

असिफभाई महालदार हे उद्योजक आहे. त्यांची रिलायन्स फायर सिस्टीम या कंपनी आहे. त्यांच्या कंपनीला या मोहिमेसाठी सहा कोटींचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. ते मुळचे जुन्नर तालुक्यातील राजुरीत राहतात. चंद्रयान मोहिमेदरम्यान काही धोका झाला तर मोठी आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठी यंत्रणा तैनात ठेवावी लागते. ही अग्निशामक यंत्रणा असिफभाई महालदार यांच्या रिलायन्स फायर सिस्टीम या कंपनीने पुरवली होती. श्रीहरिकोटा येथे ही यंत्रणा स्थापित करण्यात आली होती.

त्यासोबतच राजुरी गावातील मयुरेश शेटे हे इस्त्रोत शास्त्रज्ञ आहेत. या चांद्रयान मोहिमेत मोठा सहभाग आहेत. सिनियर सायंटिस्ट म्हणून शेटे काम पाहतात. त्यांनीदेखील मोठी मेहनत करत चांद्रयान-3 या मोहिमेत सहभाग घेतला होता. त्यांचे वडिल राजुरीत प्राचार्य आहेत आणि मयुरेश यांचं प्राथमिक शिक्षण राजुरीतील शिक्षण विद्या विकास मंदिर येथे झालं आहे.

जुन्नरकरांना अभिमान…

आज देशासाठी अभिमानाचा दिवस आहे. त्यामुळे देशातील प्रत्येकालाच या मोहिमेचा अभिमान आहे. मात्र यातच आपल्या लहान गावातून शिक्षण घेऊन श्रीहरिकोटा मध्ये झालेल्या उड्डाणापर्यंतचा प्रवास फार कठीण होता. मात्र गावातील या दोघांनी जिद्द ठेवून आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करुन जुन्नरकरांची मान उंचावली आहे.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!