सरकारी नोकरीरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे. टाटा मेमोरियल सेंटरने मल्टी-टास्किंग स्टाफ , डेटा एंट्री ऑपरेटर , परिचारिका, संशोधन सहाय्यक, तांत्रिक अधिकारी आणि इतर पदांसह 164 विविध जांगांवर भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 22 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2022 या कालावधीत पात्रतेनुसा आणि पदांप्रमाणे या भरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी उपस्थित राहू शकतात.
भरतीसाठी आवश्यक पात्रता
या पदांवर भरतीसाठी 10वी/ 12वी/ बी.फार्मा/ ग्रॅज्युएशन/ बीडीएस/ बीएएमएस/ बीएचएमएस/ एमडीएस/ आयुष/ एमपीएच/ एमडीएससह अतिरिक्त पात्रतेसह आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अधिसूचनेत दिलेल्या या पदांसाठी अर्ज करू शकतात. मल्टी-टास्किंग स्टाफ या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा आणि त्याला अधिसूचनेत दिल्याप्रमाणे संबंधित क्षेत्रातील अनुभव असावा. या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अर्ज कसा करावा, पगार काय असेल यासह वयोमर्यादा, आवश्यक पात्रता, अनुभव, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलासाठी या https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobId=18372 लिंकवर क्लि करु शकता.
अर्ज कसा करावा ?
इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिसूचनेवर दिलेल्या पदांनुसार वेळापत्रकानुसार 22 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2022 पर्यंत पुढील चर्चेसाठी उपस्थित राहू शकतात. अधिसूचना तपासण्यासाठी थेट लिंक येथे https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobId=18372 दिलेली आहे. या लिंकवर करून तुम्ही भरती संदर्भातील इतर तपशील पाहू शकता.
