सोलापूर :-

सोलापूरचे उद्योजक श्री रविंद्र माणिक गोयल यांना वसंत सोशल फाउंडेशन, नाशिक आयोजित क्रांतीवीर वसंतराव नाईक राज्यस्तरीय पुरस्काराने २०२२. नाशिक येथे सन्मानित करण्यात आले. वसंत सोशल फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने व्यापारी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन २०२२ चार राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा नाशिक येथील जय गुरूदत्त लाॅन्स येथे संपन्न झाला.त्यात रविंद्र माणिक गोयल यांना पुरस्कार, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार सौ सिमाताई हिरे, श्री मंचकराव इप्पर पोलिस उपआयुक्त पुणे, माजी आमदार श्री बाळासाहेब सानप, श्री पंढरीनाथ थोरे, श्री राजेन्द्र पानसरे,श्री नंदू सानप यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री रविंद्र माणिक गोयल यांच्या कार्याची दखल घेत पुरस्काराने गौरविण्यात आले. रविंद्र माणिक गोयल लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष, गुरूविधा प्रतिष्ठान चे सदस्य, सोलापूर आयुक्तालय शांतता कमिटी सदस्य, नवी पेठ व्यापारी सदस्य आहेत. त्यांनी आजपर्यंत विविध कार्य सामाजिक संघटना, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, संस्कृतीक कार्यक्रम आयोजित केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!