कोल्हापुर :
कोल्हापुरात लव जिहाद (Love Jihad) सारखा प्रकार घडला आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले असल्याचा आरोप करण्यात आलाय. याप्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात संबंधित मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. परंतु, पोलिस कारवाई करण्यात पोलिस दिरंगाई करत असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केलाय. या घटनेला 18 दिवस उलटून गेले आहेत, मात्र अद्याप मुलीचा शोध लागलेला नाही. याबाबत मुलीच्या कुटुंबियांनी जुना राजावाडा पोलिसांना याबाबत जाव विचारला आहे.
मुलीच्या कुटुंबियांच्या आक्रमकतेनंतर पोलिसांनी दोन दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. आम्हाला न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्रत सर्व ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय.
या प्रकरणातील मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रकरण नाजूक असल्याने पोलिस काळजीपूर्वक तपास करत आहेत. प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
