भोसरी :
सुतळी बॉम्ब लावून गाडीची हेडलाईट फोडल्याच्या वादातून भोसरीमध्ये एका तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली
पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरामध्ये ही घटना घडली. महत्त्वाचं म्हणजे ज्या तरुणाचा खून
झाला आहे तो एक सराईत गुन्हेगार आहे. या प्रकरणात चार तरुणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
मात्र या घटनेने ऐन दिवाळीतच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमका वाद काय?
देशात आणि राज्यात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दिवाळीत लोकांनी फटाके फोडत हा उत्सव साजरा केला.
मात्र फटाक्यामुळे चक्क एका तरुणाचा खून झाला आहे. दोन दिवसांपूर्वी एका तरुणाने सोन्या जाधव या तरुणाच्या गाडीजवळ सुतळी बॉम्ब
त्याने या फटाक्याने त्याच्या गाडीची हेडलाईट फोडली. मात्र असे करणे त्याला चांगलेच महागात पडले आहे. एका फटाक्यापासून सुरु झालेला वाद हा खूनापर्यंत
यामध्ये पवन विष्णू जाधव या तरुणाचा चाकून वार करत खून करण्यात आला आहे. या तरुणाच्या शरीरावर चाकूने सपासप वार करण्यात आले आहे.
पवन विष्णू जाधव हा या परिसरातील सराईत गुन्हेगार आहे. याच कारणामुळे पूर्ववैमस्यातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.
चार तरुणांना पोलिसांनी केली अटक
पवन जाधव या तरुणावर राग असल्याने सोन्या जाधव, अक्षय काळे तसेच त्यांच्या काही मित्राने विष्णूच्या हत्येचा कट रचला होता. यानंतर त्याचा खून करण्यात आला.
जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांना आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला. यावेळी पोलिसांनी चार तरुणांना ताब्यात घेतले आहे तर आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अक्षय काळे, सोन्या जाधव, गणेश शिंदे, हर्षल परशुराम जाधव, साहिल मस्के यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. उर्वरित आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.
दरम्यान दिवाळीमध्ये अशी घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. तसेच शहरातील गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
