पिंपळवंडी :
आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळवंडी या ठिकाणी बैठक घेण्यात आलेली आहे .पिंपळवंडी हे गाव पोलीस स्टेशन हद्दीतील मोठे गाव असून सदर गावांमध्ये पाच वाड्या मिळून एक ग्रामपंचायत आहे . बैठकीमध्ये सर्व ग्रामस्थ इतर सदस्य, तंटामुक्तीचे सदस्य, तलाठी मॅडम, पोलीस पाटील व इतर मान्यवर हजर होते.
संयुक्त ग्रामपंचायत कार्यालय पिंपळवंडी येथे आळेफाटा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पी. आय. श्री. नलावडे साहेब यांचा सत्कार महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, तसे पिंपळवंडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी आदरणीय नलावडे साहेब यांनी गावांमध्ये कायदा सुव्यवस्था राखणे संदर्भात तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला यांना सतर्क राहण्याचे तसेच संरक्षणार्थ प्राथमिक उपायोजना संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी पुणे जिल्हा परिषद गटनेते शरदराव लेंडे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथशेठ लेंडे, पंचायत समिती सदस्य शामराव माळी, शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश अण्णा काकडे, तंटामुक्ती अध्यक्ष पिराजी शेठ टाकळकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव वाकचौरे, शेतकरी संघटनेचे जुन्नर तालुका अध्यक्ष संजय भुजबळ, माजी सरपंच हेमलता सोनवणे, पोलीस पाटील इरफान तांबोळी, संदीप कसबे, तंटामुक्ती उपाध्यक्ष अनिता कोकाटे, सर्व तंटामुक्ती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य सत्यवान नाना काकडे, सचिन ठाणेकर, साधना चोरडिया, दैनिक सकाळचे पत्रकार सिद्धार्थ कसबे आधी उपस्थित होते.
1) गाव मध्ये होणारे किरकोळ स्वरूपाचे तंटे जमिनी संदर्भातील तंटे हे गाव मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून मिटवण्याबाबत गावातील ग्रामस्थ पुढाकार घेत असून त्यांना मार्गदर्शन व आवश्यक सूचना सूचना करण्यात आलेल्या आहे .
2) ज्येष्ठ नागरिक यांना बैठकीमध्ये घ्यावयाची काळजी तसेच शासनाकडून सुरू झालेला हेल्पलाइन नंबर 14567 द्वारे वैद्यकीय, पेन्शनबाबत मदत, वृद्धाश्रम, विरंगुळा व इतर सुविधा संदर्भात माहिती देऊन योग्य त्या खबरदारीच्या सूचना करण्यात आलेल्या आहे .
3) आगामी शिवरात्री व शिवजयंतीच्या अनुषंगाने गावातील प्रतिष्ठित नागरिक मिरवणुकीचे आयोजक यांना योग्य ते मार्गदर्शन करून वाहतूक नियमन व ध्वनी प्रदूषण बाबत योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहे .
4) उपस्थित महिलांना महिलांसंदर्भातील कायदे तसेच बाहेर जाताना येताना कशाप्रकारे सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन करून विकत सूचना करण्यात आलेल्या आहे .
5) गावामध्ये ग्राम सुरक्षा दल स्थापन केलेला असून सदर ग्रामसुरक्षा दलातील युवकांना रात्रगस्त कशाप्रकारे करावी .गावामध्ये होणाऱ्या चोऱ्या कशाप्रकारे आळा घालावा या संदर्भात उपस्थित त्यांना त्यांचे कर्तव्य बाबत मार्गदर्शन करून सूचना करण्यात आलेल्या आहे .
संयुक्त ग्रामपंचायत कार्यालय पिंपळवंडी येथे आळेफाटा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पी. आय. श्री. नलावडे साहेब यांचा सत्कार महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, तसे पिंपळवंडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी आदरणीय नलावडे साहेब यांनी गावांमध्ये कायदा सुव्यवस्था राखणे संदर्भात तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला यांना सतर्क राहण्याचे तसेच संरक्षणार्थ प्राथमिक उपायोजना संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी पुणे जिल्हा परिषद गटनेते शरदराव लेंडे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथशेठ लेंडे, पंचायत समिती सदस्य शामराव माळी, शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश अण्णा काकडे, तंटामुक्ती अध्यक्ष पिराजी शेठ टाकळकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव वाकचौरे, शेतकरी संघटनेचे जुन्नर तालुका अध्यक्ष संजय भुजबळ, माजी सरपंच हेमलता सोनवणे, पोलीस पाटील इरफान तांबोळी, संदीप कसबे, तंटामुक्ती उपाध्यक्ष अनिता कोकाटे, सर्व तंटामुक्ती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य सत्यवान नाना काकडे, सचिन ठाणेकर, साधना भाभी चोरडिया, दैनिक सकाळचे पत्रकार पत्रकार सिद्धार्थ कसबे आधी उपस्थित होते.