जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केले आहे. ट्विटरचे नवे मालक झाल्यानंतर त्यांनी ट्विटरवर पूर्णपणे नियंत्रण ठेवले आहे.
आपल्या पहिल्याच निर्णयात त्यांनी ट्विटरचे भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल ,
कायदेशीर, धोरण आणि ट्रस्टच्या प्रमुख विजया गड्डे आणि मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांना काढून टाकले. यासोबतच मस्क आणि ट्विटर यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला वादही संपुष्टात आला आहे.
पराग अग्रवाल यांना ट्विटरमधून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर सुद्धा त्यांच्या बायोडाटावर सीईओ ट्विटर असे लिहिलेले आहे.
पराग अग्रवाल यांना बाहेरचा रस्ता दायवण्याबाबतचा मस्क यांनी घेतलेला निर्णय त्यांना खूप महागात पडणार आहे. मस्क यांनी ट्विटर विकत घेताच पराग अग्रवाल यांना काढून टाकण्यात येईल ही शक्यता आधीपासून वर्तवली जात होती.
अनेकवेळा सार्वजनिक मंचावर दोघांमध्ये वादावादी झाली आहे. ट्विटरवरील फेक अकाऊंट, बोट अकाऊंट आणि ट्विटरवरील शब्दांची संख्या यामुळे त्यांच्यात वाद होत होते.
त्यामुळे मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर लगेचच अग्रवाल यांना काढून टाकणार असल्याचे आधापासून स्पष्ट झाले होते. पराग अग्रवाल यांना ट्विटरमध्ये येऊन एक वर्ष देखील पूर्ण झाले नाही.
ते मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये ट्वीटरचे सीईओ झाले होते.
एलन मस्कने यांनी वर्षी एप्रिलमध्ये ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली होती. सर्वात आधी त्यांनी ट्विटरमध्ये 9.2 टक्के शेअर्स विकत घेतले त्यानंतर त्याला बोर्ड सदस्यांमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले गेले.
पण त्यांनी बोर्डात सहभागी होण्यास नकार दिला आणि नंतर $44 अब्ज मध्ये ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली. सुरुवातीला ट्विटरच्या शेअरधारकांनी या ऑफरला विरोध केला. पण नंतर त्यांनी या कराराला सहमती दर्शवली होती.
अशामध्ये पराग अग्रवाल आणि मस्क पोट यांच्यात पोट खात्यावर वाद झाला. त्यानंतर मस्क यांनी ही डील रद्द केली होती. पण नंतर हे प्रकरण अमेरिकन कोर्टात पोहचले.
तेव्हा मस्क यांनी जुन्या ऑफरवर डील करण्यास सहमती दर्शवली आणि ही डील पूर्ण झाली.
